BIG NEWS : अजितदादा उद्या बारामती दौऱ्यावर; सकाळी सहयोग निवासस्थानी जनता दरबाराचं आयोजन

बारामती : न्यूज कट्टा  

उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या रविवार दि. ५ जानेवारी रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. पहाटेपासूनच ते आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. तर सकाळी साडेदहा वाजता सहयोग निवासस्थानी जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये अजितदादा उपस्थित नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. दरम्यान, उद्या बारामती शहर आणि परिसरात अजितदादांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या बारामती दौरा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ते बारामती शहर आणि परिसरातील विकासकामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ९ वाजता मेडद येथील बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या पेट्रोलपंपचे उदघाटन अजितदादांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी ९.४५ वाजता वस्ताद बाजीराव काळेनगर येथे मिक्सर वाटप कार्यक्रमाला अजितदादा उपस्थित राहतील. त्यानंतर सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयात मेडिकोज गिल्डच्या वतीने आयोजित महिलांच्या मोफत कर्करोग तपासणी शिबिरास भेट देतील.

सकाळी १०.३० वाजता सहयोग निवासस्थानी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये उपस्थित नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेणार आहेत. दुपारी २ वाजता रुई येथील बारामती खरेदी विक्री संघाच्या पेट्रोलपंप व सीएनजी पंपाचे उदघाटन अजितदादांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारी २.४५ वाजता एमआयडीसीतील समर्थ आयकॉन प्रकल्पाअंतर्गत सेवेन स्टार आयकॉन या गृहप्रकल्पाचे भूमीपूजन होईल. दुपारी ३.३० वाजता बारामती औद्योगिक वसाहतीमधील मॅकडोनाल्ड फ्रँचाईसीचे उदघाटन अजितदादांच्या हस्ते होणार आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!