बारामती : न्यूज कट्टा
उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या रविवार दि. ८ सप्टेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. उद्या सकाळी १० वाजता कसबा येथील राष्ट्रवादी भवनात अजितदादांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. तसेच दुपारी १२ वाजता पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. सायंकाळी बारामती शहरात विविध मंडळांनी आयोजित केलेल्या गणेशोत्सव कार्यक्रमाचं अजितदादांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या रविवारी बारामती दौऱ्यावर येत आहेत. सकाळी १० वाजता राष्ट्रवादी भवनात अजितदादांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अजितदादा नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतील. दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी भवनातील सभागृहात पक्ष प्रवेश कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये बारामती शहर व परिसरातील अनेक कार्यकर्ते अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करतील.
संध्याकाळी ६ वाजता सूर्यनगरी येथे अनंत युवा प्रतिष्ठान आयोजित गणेश फेस्टिव्हलचे उदघाटन अजितदादा व खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ७ वाजता कविवर्य मोरोपंत नाट्यगृहात अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाच्या श्रीमंत आबा गणपती महोत्सवाचे उदघाटन होईल. रात्री ८ वाजता नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या जाणाऱ्या बारामती गणेश फेस्टिव्हलच्या उदघाटन कार्यक्रमाला अजितदादा उपस्थित राहणार आहेत.





