BIG NEWS : उद्या अजितदादांचा बारामती दौरा; सकाळी सहयोग निवासस्थानी जनता दरबाराचे आयोजन

बारामती : न्यूज कट्टा

उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या शनिवार दि. १२ जुलै रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ते ६ वाजता आपल्या दौऱ्याची सुरुवात करून बारामती शहर आणि परिसरातील विकासकामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ९ वाजता सहयोग निवासस्थानी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या शनिवारी बारामतीच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ६ वाजल्यापासून ते बारामती शहर आणि परिसरातील विकासकामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ९ वाजता सहयोग निवासस्थानी जनता दरबार होणार आहे. यामध्ये अजितदादा नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतील. सकाळी १२.३० नंतर ते पुढील बैठकीसाठी जाणार आहेत.

दुपारी १ वाजता इंदापूर रस्त्यावरील सावित्री हॉस्पिटलचे उदघाटन अजितदादांच्या हस्ते होणार आहे. तर १.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमजवळ माधवबाग पंचकर्म व हृदयरोग निवारण केंद्राचे उदघाटन होईल. दुपारी ३ वाजता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता बारामती क्लब येथे बिल्डर असोसिएशनचा पदग्रहण समारंभ अजितदादांच्या उपस्थितीत होणार आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!