BIG NEWS : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या बारामतीत जनता दरबार; राष्ट्रवादी भवनात नागरीक व कार्यकर्त्यांच्या घेणार भेटीगाठी..!

बारामती : न्यूज कट्टा 

उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या रविवार दि. १५ सप्टेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ६ वाजल्यापासून अजितदादांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. सकाळी ८.३० वाजता कसबा येथील राष्ट्रवादी भवनात जनता दरबार पार पडणार आहे. यामध्ये अजितदादा नागरीक व कार्यकर्त्यांच्या भेटी घेवून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

रविवार दि. १५ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ६ वाजता अजितदादांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. बारामती शहर आणि परिसरातील विकासकामांची अजितदादा पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता बारामती शहरातील कसबा येथील राष्ट्रवादी भवनामध्ये जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं आहे. 

या जनता दरबारात अजितदादा नागरीक आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत. तसेच त्यांच्या अडीअडचणी समजून घेतील. त्यानंतर ११ वाजता माळेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आयोजित संविधान मंदिराच्या उदघाटन समारंभास ऑनलाईन हजेरी लावणार आहेत. या सर्व कार्यक्रमानंतर अजितदादा पुढील दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत.. 

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!