BIG NEWS : उद्या काटेवाडीच्या पवार फार्मवर दिवाळी भेट कार्यक्रम; अजितदादा घेणार कार्यकर्ते आणि नागरिकांच्या भेटीगाठी

बारामती : न्यूज कट्टा

दीपावलीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या शनिवार दि. २ नोव्हेंबर रोजी दीपावली पाडव्यानिमित्त काटेवाडी येथील पवार फार्म येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान स्वत: अजितदादांनी ही माहिती दिली आहे. अजितदादांसह खासदार सुनेत्रा पवार, युवा नेते पार्थ पवार आणि जय पवार हेदेखील या दिवाळी भेट कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

दरवर्षी दिवाळीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी दिवाळी भेटीचा कार्यक्रम होतो. मात्र गेल्यावर्षी राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर या दिवाळी भेटीच्या कार्यक्रमात बदल झाला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे गोविंद बाग येथे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे काटेवाडी येथील पवार फार्म येथे कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती तालुक्याचा झंझावाती दौरा केला. या दौऱ्यादरम्यान, ग्रामस्थांशी संवाद साधताना यावर्षी काटेवाडी येथील पवार फार्म येथे दिवाळी भेटीचा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती अजितदादांनी दिली. सकाळी साडेसहा वाजल्यापासून अजितदादा कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातील प्रमुख नेतेही अजितदादांच्या भेटीसाठी बारामतीत येणार आहेत. या कार्यक्रमाला खासदार सुनेत्रा पवार, युवा नेते पार्थ पवार आणि जय पवार यांचीही उपस्थिती असणार आहे.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रथमच अजितदादा स्वतंत्रपणे काटेवाडी येथे कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत. तर दरवर्षीप्रमाणे शरद पवार हेही गोविंद बागेत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे उद्या होत असलेल्या या दोन्ही कार्यक्रमांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!