BIG NEWS : स्वामी चिंचोलीत लुटमारीसह अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून आरोपींच्या शोधासाठी पाच पथके रवाना

दौंड : न्यूज कट्टा   

पंढरपूरला वारीसाठी निघालेल्या भाविकांना कोयत्याचा धाक दाखवत लूटमार करून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे सोमवारी घडली होती. या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पाच पथके रवाना केली आहेत. लवकरच आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सोमवारी पहाटे पुणे-सोलापूर महामार्गावर स्वामी चिंचोली येथे पंढरपूरकडे निघालेले भाविक चहासाठी थांबले होते. चहा पिऊन पुन्हा कारमध्ये बसत असताना एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकत दागिने व रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर कारमध्ये बसलेल्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने रस्त्यालगतच झुडपात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर दौंड तालुक्यासह पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील संशयितांची छायाचित्रे पोलिसांनी प्रसारीत करत आरोपींच्या शोधासाठी पाच पथके रवाना करण्यात आली आहेत. या आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिली.

आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत उपस्थित केला मुद्दा

दरम्यान, याबाबत काल दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. या घटनेचा निषेध करतानाच आरोपींचा तातडीने शोध घेऊन हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. दौंड तालुक्यातील यवत आणि दौंड पोलिस ठाण्याचे विभाजन करून पाटस येथे स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण करण्याची, तसेच आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!