BIG NEWS : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तीन दिवस ट्रॅफिक ब्लॉक; ‘या’ तीन दिवसांसाठी असणार ट्रॅफिक ब्लॉक

पुणे : न्यूज कट्टा

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर कि.मी ५८/५०० (डोंगरगाव/ कुसगांव) येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर्स बसविण्याचे काम सुरू असून २२, २३ आणि २४ जानेवारी असे तीन दिवस दुपारी १२ ते ३ या वेळेत या लांबीत ब्लॉक घेण्यात येणार असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी पुणे वाहिनीवरील वाहतूक द्रुतगती मार्गाच्या किमी क्रमांक ५४/७००  वळवण ते वरसोली टोल नाका (राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८) येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. वरील तिन्ही दिवस दुपारी ३ वाजल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवरुन सोडण्यात येईल. तसेच या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरुन सुरू राहणार आहे.

द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या अनुषंगाने आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. या कालावधीदरम्यान वाहनचालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. 9822498224 या किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!