पुणे : न्यूज कट्टा
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले असून, शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे सुपुत्र तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, जिल्हा परिषदेच्या बालकल्याण समितीच्या सभापती सुनीताताई गावडे, शिरुरच्या माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीच्या ऐन धामधुमीत राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या कुटुंबीयांनी आज राष्ट्रवादीशी फारकत घेत चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी उत्तरचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, आमदार राहुल कुल, दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे, माजी आमदार संजय जगताप, प्रवीण माने, जयश्री पलांडे, धर्मेंद्र खांडरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या गतिमान सरकारमुळे राज्यात भाजपाला भरभरुन प्रतिसाद आणि आशीर्वाद मिळत आहे. भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याचा नेहमीच योग्य सन्मान राखला जातो. राजेंद्र गावडे यांनाही पक्षात योग्य सन्मान मिळेल, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुनीता गावडे यांनी पक्ष प्रवेशाबाबत भूमिका मांडली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वाढवण्यासाठी गावडे कुटुंबांनी अतिशय कठोर परिश्रम घेतले. मात्र पक्ष नेतृत्वाने नेहमीच साप्त्न वागणूक दिली. त्यामुळे भाजपाचा विकासाचा अजेंडा आणि कार्यकर्त्यांना मिळणारा सन्मान यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.





