BREAKING NEWS : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर रोजी दौंडच्या दौऱ्यावर; पाटस येथे होणाऱ्या कार्यक्रमाची प्रशासनाकडून जय्यत तयारी

पाटस : न्यूज कट्टा

पंचायत राज आणि ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून मंगळवार दि. ३० सप्टेंबर रोजी महत्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दौंड तालुक्यातील पाटस येथे येणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच कार्यक्रम स्थळाची पाहणी करत सोई-सुविधांचा आढावा घेतला.

ग्रामविकास विभागाने आयोजित केलेल्या महत्वपूर्ण कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौंड दौरा निश्चित झाला आहे. पाटस येथे दि. ३० सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होत असून प्रशासनाकडून या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. आमदार राहुल कुल, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी पोलिस बापूराव दडस, पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, गोपाळ पवार, प्रांताधिकारी रेवणनाथ लबडे, तहसीलदार अरुण शेलार, गटविकास अधिकारी अरुण मळभर यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी करत आढावा घेतला.

कार्यक्रमस्थळी करावयाची सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, नागरिकांसाठी सोईसुविधा यासह कार्यक्रम स्थळाची आखणीबद्दल यावेळी चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाचे नियोजन करताना कोणत्याही गोष्टीची कमतरता राहू नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!