CRIME BREAKING : आधी प्रेमसंबंध, मग गर्भपात; गर्भपातावेळी दगावलेल्या महिलेसह दोन मुलांना जीवंत नदीत फेकलं; मावळमध्ये तिहेरी हत्याकांडाची घटना आली समोर

पुणे : न्यूज कट्टा  

विवाहबाह्य संबंधातून गर्भवती झालेल्या महिलेचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला होता. या महिलेच्या मृतदेह इंद्रायणी टाकताना तिच्या मुलांनी पाहिलं. मात्र या प्रकाराची वाच्यता होऊ नये यासाठी निर्दयी प्रियकर व त्याच्या साथीदारांनी तिच्या मुलांनाही जीवंत इंद्रायणी नदीत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार मावळ तालुक्यात घडला आहे. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, एका मातेसह मुलांच्या तिहेरी हत्याकांडानंतर मावळ तालुका हादरला आहे.

गजेंद्र जगन्नाथ दगडखैर (रा. वराळे, ता. मावळ ) आणि रविकांत भानुदास गायकवाड (रा. सावेडी, अहमदनगर ) अशी या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, गजेंद्र दगडखैर याचे एका महिलेशी विवाहबाह्य संबंध होते. त्यातून ही महिला गरोदर राहिली होती. त्यामुळे गजेंद्रने ६ जुलै रोजी तिला कळंबोली येथे गर्भपातासाठी नेले होते. सोबतच तिची २ आणि ५ वर्षांच्या मुलांनाही नेले होते. कळंबोलीतील अमर रुग्णालयात या महिलेचा गर्भपात करण्यात आला. परंतु डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या महिलेचा दि. ८ जुलै रोजी मृत्यू झाला.

या घटनेनंतर गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेने मध्यस्थी करत या महिलेचा मृतदेह गजेंद्रचा मित्र रविकांत गायकवाड यांच्या साथीने मावळमध्ये आणला. त्यानंतर गजेंद्र आणि रविकांतने ९ जुलै रोजी अंधाराचा फायदा घेत इंद्रायणी नदीच्या प्रवाहात हा मृतदेह फेकून दिला. हा प्रकार पाहून या महिलेच्या दोन मुलांनी रडायला सुरुवात केली. त्यामुळं आता आपला भांडाफोड होणार या भीतीने या दोन्ही मुलांना जीवंतपणी इंद्रायणी नदीत फेकून दिले.

दरम्यानच्या काळात, तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात संबंधित महिलेच्या कुटुंबीयांनी या महिलेसह दोन मुले बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. मृत महिलेला गजेंद्र याने अनेकदा संपर्क साधल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा फिरवत गजेंद्र आणि त्याचा साथीदार सूर्यकांत यांच्याकडे चौकशी सुरू केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या दोघांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली.

या प्रकरणी पोलिसांनी या दोघांसह एजंट महिला, कळंबोलीतील हॉस्पिटलशी संबंधित डॉक्टर आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या साथीदारांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर मावळ तालुका हादरला आहे. विवाहबाह्य संबंधातून एकाच कुटुंबातील निष्पाप जीवांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत असून संबंधित आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!