CRIME BREAKING : मेडिकलच्या अॅडमिशनसाठी ४६ लाख रुपयांची केली फसवणूक, दौंड पोलिस ठाण्यात कात्रजच्या दोघा भावांवर गुन्हा दाखल

दौंड : न्यूज कट्टा  

मेडिकलच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देतो म्हणून कात्रजमधील एका डॉक्टरसह त्याच्या भावाने ४६ लाख घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी फसवणुक झालेल्या डॉक्टरांनी दौंड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. अक्षय देशमुख आणि सागर देशमुख (रा. कात्रज, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा भावांची नावे आहेत. या प्रकरणी डॉ. संजीव केशव करंडे (रा. समतानगर, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, डॉ. संजीव करंडे यांना मेडिकलमधील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करायचे होते. त्यासाठी चौकशी करत असताना त्यांची डॉ. अक्षय देशमुख व सागर देशमुख या दोघा भावांशी भेट झाली.

त्यांनी एमडी मेडीसीन (पीजी) करण्यासाठी अॅडमिशन करून देतो असे सांगून डॉ. करंडे यांच्याकडून वेळोवेळी पैशांची मागणी करत तब्बल ४६ लाख रुपये उकळले. मात्र प्रत्यक्षात अॅडमिशन झालेच नाही. त्यामुळे आपला विश्वास संपादन करून फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. करंडे यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार डॉ. अक्षय व सागर देशमुख या दोघांवर भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४),३१६(२),३(५) या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!