CRIME BREAKING : दहा मिनिटांत येतो सांगून गेला अन शरीरावर चटके दिलेल्या अवस्थेत विवस्त्र मृतदेह आढळला; माळशिरसमधील धक्कादायक घटना

माळशिरस : न्यूज कट्टा

माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील एका युवकाची अज्ञात कारणातून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या युवकाचा विवस्त्र अवस्थेत शरीरावर चटके दिलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

आकाश अंकुश खुर्द (वय २८) असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दि. १० मार्च रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आकाश हा पिलीव येथील आपल्या घरी कुटुंबियांसह होता. या दरम्यान, त्याला अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्यानं आपल्या आईला दहा मिनिटांत परत येत असल्याचं सांगितलं आणि तो घराबाहेर पडला. मात्र संपूर्ण रात्र उलटूनही तो घरी परतला नाही. दुसऱ्या दिवशी मंगळवारी पिलीव-माळशिरस रस्त्यावरील वनक्षेत्रात विवस्त्र अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आकाशच्या पाठीवर, दंडावर, मांडीवर आणि पोटावर मारहाण करून चटके देण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्याला पूर्णपणे विवस्त्र करून निर्घृणपणे त्याचा खून करण्यात आला आहे. प्रेम प्रकरण किंवा अनैतिक संबंधातून त्याचा खून झाला असण्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे. माळशिरस पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, एका युवकाचा अमानुषपणे खून झाल्याच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!