CRIME NEWS : स्वयंपाक येत नाही म्हणून पोटच्या मुलीला चटके; खोलीतही डांबून ठेवलं, मुलीची आई-वडीलांविरोधात तक्रार

वाळूज : न्यूज कट्टा

आपल्या मुलीला स्वयंपाक येत नाही म्हणून आई-वडिलांनी चटके देत तिला खोलीत डांबून ठेवल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजी येथे घडला आहे. या प्रकरणी संबंधित अल्पवयीन मुलीने आई-वडिलांविरोधात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आई-वडिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पिंकी कंवर लक्ष्मणसिंग नाथावत (वय ३५), लक्ष्मणसिंग नाथावत (वय ४०, रा. रांजणगाव शेणपुंजी) असं या अल्पवयीन मुलीचा छळ करणाऱ्या आईवडिलांचं नाव आहे. याबाबत माहिती अशी की, पिडीत मुलगी ही १७ वर्षांची असून तिची आई तिला स्वयंपाक येत नाही म्हणून सतत त्रास देत होती. घरात अपमानास्पद वागणूक देणे, सतत मारहाण करणे असेही प्रकार घडत होते.

याचदरम्यान, पिडीत मुलीला तिच्या आईने चपात्या बनवण्यासाठी सांगितलं. मात्र तिला चपात्या बनवता आल्या नाहीत. त्यामुळं आईनं तिच्या हातावर चटके दिले. तसेच पीडितेला घराच्या गच्चीवर कोंडणे, बाथरूममध्ये कोंडणे, शिवीगाळ करून मारहाण केली जात होती असेही पिडीतेने फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित आई-वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून शारीरिक आणि मानसिक त्रास होत असल्याचं सांगत या मुलीने स्वत:च्या आईवडीलांच्या विरोधात पोलिसात धाव घेतली आहे. पोलिसांनीही या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!