DAUND BREAKING : जन्मदात्या आईनंच घेतला दोन चिमूरड्यांचा जीव; पतीवरही केले कोयत्यानं वार, दौंड तालुक्यातील खळबळजनक घटना

दौंड : न्यूज कट्टा

संपूर्ण पुणे जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना दौंड तालुक्यात घडली आहे. एका महिलेने आपल्या दोन चिमूरड्यांचा गळा दाबून खून करत पतीवरही कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील शिंदेवस्तीवरही घटना घडली आहे. या प्रकरणी दौंड पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे. या घटनेनंतर दौंडसह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

शंभू दुर्योधन मिंढे (वय १ वर्ष) आणि पियू दुर्योधन मिंढे (वय ३ वर्ष) अशी या घटनेत मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत. तर दुर्योधन आबासाहेब मिंढे (वय ३५) हे या घटनेत जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कोमल दुर्योधन मिंढे या महिलेला अटक केली आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दुर्योधन मिंढे हे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून पुण्यातील खराडी येथील कार्यरत आहेत. ते आपल्या पत्नी व मुलांसह स्वामी चिंचोली येथील शिंदेवस्ती येथे वास्तव्यास आहेत.

आज पहाटेच्या सुमारास कोमल मिंढे हिने आपल्या दोन मुलांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिने आपल्या पतीवरही कोयत्याने वार केले. या घटनेत या दोन्ही चिमूरड्यांचा मृत्यू झाला आहे. तर पती दुर्योधन मिंढे यांच्या मानेवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या असून त्यांना उपचारासाठी बारामती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पती-पत्नीचा वाद आणि सासरच्या छळामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर कोमल मिंढे हिला पोलिसांनी अटक केली आहे. दौंडचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार आणि कुरकुंभ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेनं दौंड व परिसरात खळबळ उडाली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!