DAUND CRIME : पत्नीशी अनैतिक संबंधांचा संशय; सासऱ्याने जाब विचारला अन् जावयानं चाकू भोसकून केली सासऱ्याची हत्या, दौंड तालुक्यातील घटना

दौंड : न्यूज कट्टा

पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून सासऱ्यानेजावयाला जाब विचारला. मात्र संतापलेल्या जावयाने थेट सासऱ्याला चाकूने भोसकून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात जावयावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर दौंड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सुदाम हिऱ्या चव्हाण (रा. बोरीबेल, ता. दौंड) असे या घटनेतील मृत सासऱ्याचं नाव आहे. तर लकझऱ्या कोब्या काळे (रा. लासुर्णे, ता. इंदापूर) असं याच्यावर दौंड पोलिसांनी सासऱ्याच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती अशी की, लकझऱ्या काळे हा इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील रहिवाशी आहे. तो आपल्या सासरवाडीत बोरीबेल येथे आलेला असताना त्याच्यात आणि सासरे सुदाम चव्हाण यांच्यात वाद झाला.

तू माझ्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवतो असं म्हणत सुदाम यांनी लकझऱ्याला शिवीगाळ केली. त्यातून संतापलेल्या लकझऱ्याने आपल्याकडील धारदार चाकू सुदामच्या छातीत खुपसला. त्यानंतर बेशुद्ध पडलेल्या सुदामला नातेवाईकांनी दौंड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या प्रकरणी दौंड पोलिसांनी लकझऱ्या काळे याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. घटनेनंतर आरोपी लकझऱ्या हा फरार झाला आहे. दरम्यान, जावयानेच सासऱ्याचा खून केल्याच्या घटनेनंतर दौंड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!