HINJEWADI ACCIDENT : भरधाव रेडीमिक्स डंपर पलटी झाला अन क्षणात सगळं संपलं; ‘त्या’ दोघींच्या मृतदेहाचे तुकडे पाहून सगळेच हेलावले..!

हिंजवडी : न्यूज कट्टा   

पुणे शहरातील हिंजवडी येथे भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. येथील वडजाईनगर कॉर्नरवर भरधाव वेगात जाणाऱ्या रेडीमिक्स डंपरखाली चिरडून दुचकीवर जाणाऱ्या दोन युवती चिरडून जागीच ठार झाल्या. या घटनेत या दोन्ही युवतींचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. दरम्यान, या अपघातानंतर या दोन्ही युवतींच्या मृतदेहाचे तुकडे फावड्याने गोळा करावे लागले. हा सर्व प्रकार पाहून उपस्थित नागरिक आणि मदतकार्य करणारे जवानही हेलावून गेले.

प्रांजली महेश यादव (वय २२, मुळ रा. टेंभूर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) आणि अश्लेषा नरेंद्र गावंडे (वय २२, मुळ रा. शेगाव, रहाटगाव रोड, अमरावती) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवतींची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रांजली आणि अश्लेषा या एमआयटी कॉलेजध्ये विज्ञान शाखेत शेवटच्या वर्षात शिकत होत्या. शुक्रवारी सायंकाळी त्या दुचाकीवरून चालल्या होत्या. हिंजवडी- माण रस्त्यावर वडजाईनगर कॉर्नरजवळ भरधाव वेगात आलेल्या डंपर चालकाचे वळणावर नियंत्रण सुटले आणि डंपर पलटी झाला. याचवेळी तेथून चाललेल्या दुचाकीस्वार प्रांजली आणि अश्लेषा या डंपरखाली चिरडल्या गेल्या. या भीषण अपघातात दोघींचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.

शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर डंपरचालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पलटी झालेल्या डंपरमध्ये तब्बल ३२ टन सिमेंट भरलेले होते. भरधाव चाललेल्या डंपरचालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्याने डंपर पलटी झाला. या प्रचंड बोजाखाली दबल्या गेल्याने दोन्ही तरूणींचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. छिन्नविछीन्न अवस्थेतील त्यांच्या मृतदेहाचे तुकडे फावड्याने गोळा करताना अग्निशमन दलाच्या जवानांसह उपस्थित नागरीक हेलावून गेले.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!