पुणे : न्यूज कट्टा
पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. त्यांना जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. तर दिवसे यांच्या जागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अप्पर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी याबाबतचे आदेश पारित केले आहेत. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुहास दिवसे हे पुण्यात जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाले होते. त्यांची आता पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. दिवसे यांच्याकडे जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालकपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना सातारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.





