JALNA ACCIDENT : आजारी सासूला उपचारासाठी नेताना कार विहिरीत कोसळली; दोन महिलांसह पाचजणांचा दुर्दैवी मृत्यू

जालना : न्यूज कट्टा  

आजारी असलेल्या सासूला विदर्भातील सुलतानपूर येथे घेऊन जाणारी कार नियंत्रण सुटल्यामुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्या एकाला जोरदार धडक देत जवळच असलेल्या विहिरीत कोसळली. त्यामुळं कारमधील पाचजणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्यातील राजुर टेंभुर्णी रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास घडली.

ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले (वय ४०), निर्मला सोपान डकले (वय २५), पद्माबाई लक्ष्मण भांबिरे (वय ५५),  ज्ञानेश्वर लक्ष्मण भांबिरे, आदिनाथ भांबिरे अशी या घटनेत मृत पावलेल्या प्रवाशांची नावे आहेत. तर मॉर्निंग वॉकला गेलेले भगवान बनकर हे या घटनेत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथील डकले परिवारातील सदस्य कोपर्डा (ता. भोकरदन) येथून अर्धांगवायूचा त्रास असलेल्या सासुबाईंना घेऊन विदर्भातील सुलतानपूर येथे जात होते. या दरम्यान, राजूर- टेंभूर्णी रस्त्यावर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉक करत असलेल्या भगवान बनकर यांना या कारची धडक बसली. नियंत्रण सुटल्याने ही कार जवळच असलेल्या विहिरीत कोसळली.

तब्बल ७० फुट खोल असलेल्या या विहिरीत कार कोसळल्याने पाचही जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलीस आणि महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. येथील मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अथक प्रयत्नानंतर दुपारी कार आणि आतमधील मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!