बारामती : न्यूज कट्टा
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने आतापर्यंत घवघवीत यश मिळवले आहे. पहिल्या फेरीपर्यंत या पॅनलने सोळा जागांवर आघाडी घेतली असून सहकार बचाव शेतकरी पॅनलने चार जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, आता उर्वरीत गटांची मोजणी सुरु होत असून दुपारपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. थेट अजितदादांनी सहभाग घेतल्यामुळे ही निवडणुक चुरशीची झाली होती. काल रात्री उशीरापर्यंत पहिल्या फेरीची मते मोजण्यात आली. त्यामध्ये अजितदादांच्या पॅनलने सोळा जागांवर आघाडी घेतली असून चार जागांवर सहकार बचाव शेतकरी पॅनल पुढे आहे. तर ब वर्गातून अजितदादा विजयी झाले आहेत.

सांगवी गटातून ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, रणजीत खलाटे, महिला राखीवमधून राजश्री कोकरे आणि बारामती गटातून नेताजी गवारे हे सहकार बचाव पॅनलचे चार उमेदवार पहिल्या फेरीत पुढे आहेत. तर निळकंठेश्वर पॅनलचे रतनकुमार भोसले, नितीन शेंडे, विलास देवकाते, संगीता कोकरे, बाळासाहेब तावरे, शिवराज जाधवराव, राजेंद्र बुरुंगले, योगेश जगताप, तानाजी कोकरे, स्वप्निल जगताप, गणपतराव खलाटे, प्रताप आटोळे, सतीश फाळके, अविनाश देवकाते, जयपाल देवकाते, देवीदास गावडे हे उमेदवार आघाडीवर आहेत.
पहिल्या फेरीचा संपूर्ण निकाल
पहिल्या फेरीअखेर मिळालेली एकुण मते
अनु जाती जमाती
गायकवाड. 3717
रतन भोसले. 4117
इतर मागासवर्ग
रामचंद्र नाले 3644
नितीन शेंडे. 4120
विमुक्त जाती NT
विलास देवकाते 4269
सूर्याजी देवकाते 3288
महिला
राजश्री कोकरे 3835
संगीता कोकरे 4021
ज्योती मुलमुले 3568
ब वर्ग
अजितदादा. 91
भालचंद्र देवकाते 10
माळेगाव
जाधवराव 4332
बाळासाहेब तावरे. 3803
संग्राम काटे 3425
रमेश गोफने. 2963
रंजनकाका. 3587
राजाभाऊ बुरुंगले 3760
पणदरे
तानाजी काका 3808
योगेश भैय्या 4110
स्वप्नील अण्णा 3796
रोहन कोकरे 3314
रणजित जगताप. 3050
सत्यजित. 3247
सांगवी
चंद्रराव तावरे 4041
गणपत खलाटे 4115
रणजित खलाटे 3747
विजय तावरे 3645
वीरेंद्र तावरे. 3332
खांडज
प्रताप आटोळे 3995
सतीश फाळके. 4117
विलास सस्ते 3258
पोंदकुले मेघश्याम 3145
निरावागज
अविनाश देवकाते 4289
केशव देवकाते. 3179
जयपाल देवकाते 3862
राजाभाऊ देवकाते. 3254
बारामती
नितीन सातव 3559
नेताजी गवारे 3740
देविदास गावडे 3898
जि बी अण्णा गावडे 3542





