बारामती : न्यूज कट्टा
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ब वर्गातून विजय झाला होता. त्यानंतर आज या निवडणुकीतील दूसरा निकाल जाहीर झाला असून अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार रतनकुमार भोसले हे निवडून आले आहेत. त्यांनी १४८७ मतांचे मताधिक्य घेत विजय मिळवला आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी काल दि. २४ जूनपासून बारामती येथील प्रशासकीय भवनात सुरू आहे. रात्री उशीरापर्यंत मतमोजणीची पहिली फेरी पार पडली असून त्यामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने आघाडी घेतली आहे. दरम्यान, काल ब वर्ग मतदारसंघाचा पहिला निकाल जाहीर करण्यात आला होता, त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ९१ मते मिळवत विजय मिळवला आहे.
त्यानंतर आज सकाळी दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू झाली आहे. त्यामध्ये दूसरा निकाल हाती आला असून अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून निळकंठेश्वर पॅनलचे रतनकुमार भोसले यांनी १४८७ मतांनी विजय मिळवला आहे. रतनकुमार भोसले यांना ८६७० मते मिळाली असून सहकार बचाव शेतकरी पॅनलचे उमेदवार बापूराव गायकवाड यांना ७१८३ मते मिळाली आहेत.





