MALEGAON BREAKING : माळेगाव कारखाना निवडणुकीत शरद पवार गटाचीही एन्ट्री; उमेदवार यादी केली जाहीर

बारामती : न्यूज कट्टा

माळेगाव कारखाना निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसपुरस्कृत श्री निळकंठेश्वर पॅनलने आज सकाळीच उमेदवार यादी जाहीर केली. त्यानंतर आता राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून बळीराजा सहकार बचाव पॅनलचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान, या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील या शक्यतांना पूर्णविराम मिळाला असून माळेगावच्या निवडणूकीत बहुरंगी लढत होताना पाहायला मिळणार आहे.

एकीकडे राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी एक होतील अशा चर्चा सुरू आहेत. अशातच माळेगाव कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतील अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या. या दरम्यान, शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेटही घेतली होती. त्यामुळे माळेगावच्या निवडणुकीत दोन्ही गट एकत्र दिसतील अशा चर्चा रंगल्या होत्या.

 

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी दि. २२ जून रोजी मतदान होणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अजितदादांच्या नेतृत्वाखालील श्री निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर शरद पवार गटाकडूनही बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून २० उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

बळीराजा सहकार बचाव पॅनलचे उमेदवार :  

गट क्र. १ : माळेगाव : अमित चंद्रकांत तावरे, राजेंद्र दौलतराव काटे, श्रीहरी पांडुरंग येळे

गट क्र. २ : पणदरे : सुशीलकुमार उत्तम जगताप, दयानंद चंद्रकांत कोकरे, भगतसिंग आबा जगताप

गट क्र. ३ : सांगवी : संजय नामदेव तावरे, राजेंद्र अशोकराव जाधव, सुरेश तुकाराम खलाटे

गट क्र. ४ : खांडज-शिरवली : सोपान तुकाराम आटोळे, तानाजी भागुजी पोंदकुले

गट क्र. ५ : निरावागज : गणपत शंकर देवकाते, शरद शंकरराव तुपे

गट क्र. ६ : बारामती : प्रल्हाद गुलाबराव वरे, अमोल देविदास गवळी

महिला राखीव : शकुंतला शिवाजी कोकरे, पुष्पा मोहन गावडे

इतर मागास प्रवर्ग : भारत दत्तात्रय बनकर

भटक्या विमुक्त जाती जमाती : ज्ञानदेव गुलाबराव बुरुंगले

अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग : राजेंद्र श्रीरंग भोसले      

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!