बारामती : न्यूज कट्टा
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ब वर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विजय झाला आहे. त्यानंतर आता अजितदादांच्या निळकंठेश्वर पॅनलचे दोन उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती आता पुढे आली आहे. यामध्ये अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील रतनकुमार भोसले आणि इतर मागास प्रवर्गातून नितीन शेंडे यांनी आघाडी घेतली आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवार दि. २२ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत १७२९६ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. आज सकाळी बारामती येथील प्रशासकीय भवनामध्ये मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये सर्वात आधी ब वर्गाची मोजणी करण्यात आली. ब वर्गातून स्वत: अजितदादांनी आपला अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये १०१ पैकी ९१ मते मिळवत अजितदादांनी विजय मिळवला आहे.
३४ टेबलवर दोन फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पार पडत आहे. सध्या अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गाची मोजणी सुरू आहे. यामध्ये अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार रतनकुमार भोसले आणि इतर मागास प्रवर्गातून नितीन शेंडे हे आघाडीवर आहेत.





