MALEGAON ELECTION : माळेगाव साखर कारखान्यावर कुणाची सत्ता..? आज दुपारपर्यंत निकाल होणार स्पष्ट

बारामती : न्यूज कट्टा

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी २२ जून रोजी मतदान झाले असून आज दि. २४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट सहभाग घेतल्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत मतदानही मोठ्या प्रमाणात झाले आहे, त्यामुळं आजच्या निकालात माळेगाव कारखान्यात कुणाची सत्ता येणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी एकूण चार पॅनल रिंगणात होते. तर ९० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनल आणि ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलमध्ये खरी लढत होत आहे. निवडणूक काळात दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

विशेष म्हणजे, माळेगाव कारखान्याच्या चेअरमनपदी स्वत: अजितदादांनी आपले नाव घोषित केले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत तब्बल ८८.५२ टक्के मतदान झाले असून कारखान्याच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, बारामतीतील प्रशासकीय भवनात ही मतमोजणी पार पडणार आहे. सुरुवातीला ब वर्ग प्रवर्गाचा निकाल घोषित केला जाणार आहे. त्यानंतर ३४ टेबलवर दोन फेऱ्यांमध्ये उर्वरीत मतमोजणी पार पडेल. त्यानुसार अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती-जमाती प्रवर्ग, महिला राखीव प्रतिनिधी आणि त्यानंतर गट क्र. १ ते ६ ची मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल.

 

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!