बारामती : न्यूज कट्टा
पंढरपूरहुन देहूकडे परतीसाठी निघालेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बारामती तालुक्यातील पिंपळी येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. परतीच्या प्रवासात पिंपळी येथे पालखीला मेंढ्यांचं रिंगण घालत अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं. यावेळी भाविकांनी पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिंपळीत दाखल झाल्यानंतर सरपंच स्वाती ढवाण, माजी उपसरपंच अश्विनी बनसोडे, छत्रपती कारखान्याचे संचालक सतीश देवकाते, माजी संचालक संतोष ढवाण, बाजार समितीचे माजी संचालक रमेश ढवाण, अशोक ढवाण,पीएमडी डेअरी मिल्क समूहाच्या संचालिका दिपाली ढवाण आदी मान्यवरांनी विश्वस्त मंडळ आणि मानकरी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पालखी सोहळ्याला तानाजी केसकर, सतीश केसकर, आबासो केसकर, तुकाराम केसकर आदींच्या मेंढ्यांनी रिंगण घालत अनोख्या पद्धतीने स्वागत केलं. पालखीच्या दर्शनासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी राष्ट्रवादी सोशल मिडियाचे उपाध्यक्ष सुनिल बनसोडे, खरेदी विक्री संघाचे नितिन देवकाते, भाऊसाहेब भिसे,पोलीस पाटील मोहन बनकर, वकील सचिन वाघ, आबासाहेब देवकाते, पिंपळी-लिमटेक सोसायटीचे अध्यक्ष दादासो केसकर, अशोकराव देवकाते, फलोत्पादक संघाचे संचालक रघुनाथ देवकाते, हरिभाऊ केसकर, महेश चौधरी, सोमनाथ यादव, दत्तात्रय तांबे, बापूराव यादव, बापूराव केसकर, रामचंद्र कचरे आदी उपस्थित होते.





