PDCC BANK : अतिवृष्टी ग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे जिल्हा बँक सरसावली; मुख्यमंत्री सहायता निधीत १ कोटी २६ लाख ५१ हजार रुपयांची मदत

पुणे : न्यूज कट्टा

राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने १ कोटी २६ लाख ५१ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला आहे. आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे.

जिल्हा बँकेकडून १ कोटी, कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार २५ लाख ५१ हजार रुपये आणि संचालक मंडळाचा सभाभत्ता १ लाख रुपये असे एकूण १ कोटी २६ लाख ५१ हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत म्हणून देण्यात आली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने याआधीही विविध आपत्तीच्या काळात सामाजिक जबाबदारी जपत मदतीचे कार्य केले आहे. यानिमित्तानं बँकेच्या संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सहकार क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक दिलीप मोहिते, संचालक भालचंद्र जगताप, विकास दांगट, सुरेश घुले, प्रविण शिंदे, संभाजी होळकर, संचालिका निर्मला जागडे, पूजा बुट्टे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उपमुख्य व्यवस्थापक समीर रजपूत, सेवक संघाचे प्रतिनिधी अजित जाधवराव, युनियन प्रतिनिधी संजय पायगुडे, रविंद्र जोशी, तसेच  अतुल साळुंखे (खाजगी सहाय्यक) आणि सेवक संचालक राजेंद्र शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!