POOJA KHEDKAR : वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरला मोठा दणका; प्रशासकीय सेवेतून मुक्त करण्याचा केंद्र सरकारने घेतला निर्णय

नवी दिल्ली : न्यूज कट्टा   

आपल्या शाही थाटामुळे आणि बेकायदेशीर कृत्यांमुळे वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकरवर केंद्रीय लोकसेवा आयोगाने कारवाई केली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारनेही पूजा खेडकरला दणका दिला आहे. केंद्र सरकारने पूजा खेडकरला भारतीय प्रशासकीय सेवेतून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

परिविक्षाधीन अधिकारी असलेल्या पूजा खेडकरची काही महिन्यांपूर्वी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती झाली होती. त्यावेळी तिच्या शाही थाटासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अरेरावी केल्यामुळे ती चर्चेत आली होती. आपल्या खासगी कारवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या पूजा खेडकरची अनेक बेकायदेशीर कृत्ये समोर आली. बनावट प्रमाणपत्र आणि नाव बदलून नियमांचं उल्लंघन करत तिने अनेकदा युपीएससीची परीक्षा दिल्याचंही समोर आलं होतं.

या सर्व प्रकरणानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने चौकशी सुरू केली होती. त्यामध्ये पूजाने नियमांचं उल्लंघन करत बनावट कागदपत्रांचा आधार घेतल्याचंही समोर आलं. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजाची नियुक्ती रद्द ठरवली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारनेही पूजा खेडकरला मोठा दणका दिला आहे. तिची भारतीय प्रशासकीय सेवेतून मुक्तता करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे.

दरम्यान, आपल्या उर्मट वागणुकीमुळे आणि अधिकाऱ्यांशी अरेरावी केल्यामुळे पूजा खेडकर चर्चेत आली. तिने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वत:साठी स्वतंत्र कक्षाची मागणी केली होती. एवढ्यावरच न थांबता तिने एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षावरही ताबा टाकला होता. त्यानंतर तिने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वापरल्याचेही समोर आले होते. तसेच अनेक बेकायदेशीर मार्गांचा वापर करत ती आयएएस अधिकारी झाल्याची बाब पुराव्यासह सिद्ध झाली. अखेर शाही थाटात वावरणाऱ्या पूजाला आपली नोकरीही गमवावी लागली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!