PRATIBIMB : मानसोपचार तज्ञ डॉ. नंदू मुलमुले यांचे आज बारामतीत व्याख्यान; यशाकडून आनंदाकडे या विषयावर साधणार संवाद

बारामती : न्यूज कट्टा

तणावग्रस्त जीवनशैलीमुळे अनेकांना वैफल्याला सामोरे जावे लागते, पालक असो वा विद्यार्थी अनेक जणांना विविध कारणांमुळे निराशा येते, याचे पर्यवसान अनेकदा नको त्या घटनांमध्ये होते. याचा विचार करुन एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने प्रसिध्द मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नंदू मुलमुले यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

आज शनिवारी दि. ३१ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता विद्यानगरीतील गदिमा सभागृहात यशाकडून आनंदाकडे या विषयावर बारामतीकरांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. रसिक बारामतीकरांची अभिरुची अधिक संपन्न व्हावी, प्रतिभावंतांशी त्यांना हितगुज साधता यावे, त्यांचे विचार ऐकता यावेत या उद्देशाने एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने खासदार सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबिंब व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते.

मनांतरी, संभ्रमाचे सांगाती, जग बदलणा-या मनाच्या प्रयोगशील कथा, महाकवी दुःखाचा- मिर्झा गालिब, व्यथा-कथा या सारख्या पुस्तकांचे डॉ. मुलमुले यांनी लेखन केले आहे. मनोचिकित्सा क्षेत्रात त्यांना चार दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!