PSI SUICIDE : पुणे पोलिस दल हादरले; तीन दिवस नॉट रीचेबल असलेल्या पोलिस अधिकाऱ्याचा मृतदेह मिळाला..!

पुणे : न्यूज कट्टा 

गेल्या तीन दिवसांपासून नॉट रीचेबल असलेल्या पुणे पोलिस दलातील अधिकाऱ्याचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला आहे. पुणे शहरातील खडकी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांचा मृतदेह लोणावळ्यातील टायगर पॉईंटजवळ मिळून आला आहे. त्यामुळे पुणे पोलिस दलात एकच खळबळ उडाली असून गुंजाळ यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अण्णा गुंजाळ हे पुणे पोलिस दलात खडकी पोलिस ठाण्यामध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. गेल्या तीन दिवसांपासून ते घरी किंवा पोलिस ठाण्यात आले नव्हते. त्यांचा फोनही लागत नसल्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते. अण्णा गुंजाळ यांचा कुटुंबीय आणि पोलिस दलातील सहकाऱ्यांकडून शोध घेतला जात होता.

दरम्यान, पोलिस नियंत्रण कक्षाच्या ११२ या क्रमांकावर एक फोन आला. लोणावळ्यातील टायगर पॉईंट येथे एक मृतदेह आढळल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्यानंतर अण्णा गुंजाळ यांचा हा मृतदेह असल्याचं निष्पन्न झालं. एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत अण्णा गुंजाळ यांचा मृतदेह मिळून आला. तसेच याच परिसरात एक कारदेखील मिळून आली आहे.

अण्णा गुंजाळ यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र या घटनेनंतर पुणे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!