Shirwal Accident : शिंदेवाडीत भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; महाबळेश्वरला निघालेल्या युवतीचा दुर्दैवी मृत्यू

शिरवळ : न्यूज कट्टा

पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी येथे नीरा नदी पुलाजवळ भीषण अपघात होऊन एका २४ वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी ही घटना घडली असून या प्रकरणी शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुबेल सिन्हा (वय २४) असं या अपघातात मृत पावलेल्या युवतीचं नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील आयटी कंपनीत कार्यरत असलेले तीन तरुण आणि एक युवती असे चौघेजण दुचाकीवरून महाबळेश्वरला निघाले होते. खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी येथील नीरा नदीच्या पुलाजवळ या युवतीच्या दुचाकीला (क्र. पीबी ०६ एयु ९९९५) भरधाव वेगातील ट्रकने जोरदार धडक दिली.

त्यामध्ये ही युवती दुचाकीवरून खाली पडलेल्या युवतीच्या शरीरावरून ट्रक गेला. यात रुबेल सिन्हा हिचा जागीच मृत्यू झाला. तर तिच्यासोबत असलेला दुचाकीचालक युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर शिरवळ पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!