SHOCKING : एकाच स्कार्फनं युवक-युवतीनं घेतला गळफास; मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हणाले, नात्यावर शंका घेऊ नका..!

सोलापूर : न्यूज कट्टा

एका स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेत एका युवक आणि युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर शहरातील कर्णिकनगर परिसरात घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळून आली असून त्यामध्ये आम्ही दोघे बहीण-भाऊ आहोत, मृत्यूनंतर आमच्या नात्यावर शंका घेऊ नका असा मजकूर नमूद करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी सोलापूरच्या सिव्हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित ठणकेदार आणि अश्विनी केशापुरे असं आत्महत्या केलेल्या युवक-युवतीचं नाव आहे. याबाबत माहिती अशी की, रोहित हा चालक म्हणून काम करत होता. तर अश्विनी हिने बी. फार्मसीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. अश्विनी ही रोहितची मानलेली बहीण होती. आज सोलापूर शहरातील कर्णिकनगर परिसरातील एका बंगल्यातील दुसऱ्या मजल्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला.

एका स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांच्या तपासादरम्यान, एक चिठ्ठी मिळाली असून त्यामध्ये आम्ही दोघे भाऊ-बहीण आहोत, आम्ही एकमेकांसोबत शेवटपर्यंत आहोत. आमच्या मृत्यूनंतर आमच्या नात्यावर कुणीही शंका घेऊ नका’ असं नमूद करण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी दोघांनीही स्टेटस ठेवत भाऊ-बहीण असा उल्लेख केल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेनंतर त्यांच्या नातेवाईक आणि कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या प्रकरणी सिव्हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांच्या आत्महत्येमागे नेमके कारण काय याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!