धक्कादायक : रात्री मेहंदी काढली अन् सकाळी आईचा मृतदेहच दिसला; मुलीनंही विहिरीत उडी मारत संपवलं जीवन, मायलेकीच्या आत्महत्येमुळं उडाली खळबळ..!

छत्रपती संभाजीनगर : न्यूज कट्टा      

रात्री घरातील कामे उरकल्यानंतर मुलीनं उत्साहानं आपल्या आईच्या हातावर मेहंदी काढली. सकाळी शेतातल्या विहिरीत आईचा मृतदेह पाहिला अन् तिनंही विहिरीत उडी मारून स्वत:चं जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे.  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या दोघींनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.

वंदना भरत दुधारे आणि पल्लवी भरत दुधारे असं या मायलेकीचं नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथे असलेल्या शेतात दुधारे कुटुंब वास्तव्यास होतं. काल रात्री घरातील सर्व कामे आटोपल्यानंतर मुलगी पल्लवी हिनं आपल्या आईच्या हातावर मेहंदी काढली. त्यानंतर दोघीही झोपी गेल्या. सकाळी उठल्यानंतर पल्लवीला आपली आई कुठेही दिसली नाही.

पल्लवीने आजूबाजूला शोध घेतला मात्र ती दिसून आली नाही. शेवटी तिने शेतात असलेल्या विहीरीकडे धाव घेतली. त्यावेळी तिला आपल्या आईचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. रात्री ज्या आईच्या हातावर मेहंदी काढली तिचा मृतदेह पाहून पल्लवीला धक्काच बसला. त्यानंतर तिनेही विहिरीत उडी मारत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या दोघींनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दुसरीकडे आपल्या आई आणि बहिणीचा मृत्यू झाल्याचं समजल्यानंतर गावाकडे येण्यासाठी निघालेल्या भावाचाही अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक जानराव हा आपल्या पत्नीसमवेत निघालेला असताना रस्त्यात त्याचा अपघात झाला. त्यामध्ये त्यालाही गंभीर दुखापत झाली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!