बारामतीच्या लखोबा लोखंडेला कोण वाचवतंय; अनेक ठिकाणी तक्रारीनंतरही गुन्हे दाखल नाहीच..!

बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा

बारामतीशेजारील तालुक्यातील नेत्याची जवळीक सांगून अनेकांना गंडवणाऱ्या लखोबा लोखंडे अर्थात आनंद लोखंडे याच्याविरोधात अनेक ठिकाणी तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र या लखोबाच्या जबाब घेण्यापुढे कोणतीच कारवाई होत नसल्यानं त्याला नेमकं कोण वाचवत आहे असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. या लखोबाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही अनेकांना चुना लावला असून काही नेत्यांची नावे सांगून तो आपण काहीच केलं नाही अशा अविर्भावात वावरत आहे.

मुंबईतील एका कंपनीकडून लोणी खरेदी, दूध पावडर पुरवठा आणि दूध पुरवठ्याच्या नावाखाली १० कोटी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून लखोबा आणि त्याच्या साथीदारांची चौकशीही करण्यात आली. मात्र अद्याप त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती पुढे आली आहे. या लखोबाने सैन्यदलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला फ्लॅट देण्याचं आमिष दाखवत दीड कोटी रुपयांना गंडा घातल्याचाही प्रकार घडला आहे. मात्र केवळ चौकशीच्या पुढे कोणतीच कारवाई होत नसल्याने लखोबाला कोण वाचवतंय असा सवाल उपस्थित होत आहे.

बारामतीत डेअरी फर्मसह विविध कंपन्या स्थापन करून आपण मोठे उद्योजक आहोत असं भासवणाऱ्या या लखोबाने बारामती जवळच्या तालुक्यातील नेत्याची जवळीक सांगत अनेकांना गंडा घातला आहे. त्यामुळे या लखोबाच्या उद्योगांबाबत विविध पोलिस ठाण्यात तक्रारी देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी त्याची चौकशीही झाली असून तो आपण आमुक नेत्याच्या जवळचे असून त्यांचे आर्थिक व्यवहार माझ्याकडेच असतात अशी बतावणी करत असल्याची माहिती पुढे येत आहे.

नेत्यांची जवळीक आणि उद्योजक असल्याचा अविर्भाव आणून व्यवहार करणाऱ्या या लखोबावर अद्याप कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या लखोबाने केवळ उद्योजकांना फसवले नसून काही राजकीय कुटुंबातील व्यक्ती आणि अधिकाऱ्यांनाही गंडा घातला आहे. त्यामुळं या लखोबावर कारवाई कधी होणार असा सवाल उपस्थित होत आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!