अर्थसंकल्पात महिलांसाठी भरीव तरतूद; बारामतीच्या विमानतळावर अजितदादांचे महिलांकडून जल्लोषात स्वागत

बारामती : न्यूज कट्टा

राज्याच्या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजने’सह महिला- भगिनींसाठी अनेक योजनांचा समावेश करून त्यांना दिलासा दिल्याबद्दल आज राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. बारामती विमानतळावर उपस्थित महिलांनी औक्षण करून फुलांची उधळण करत अजितदादांचं जंगी स्वागत केलं.

नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी विविध योजना जाहीर करत भरीव तरतूद केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे यांच्या पुढाकारातून आज बारामती विमानतळावर अजितदादांचं भव्य स्वागत करण्यात आलं. उपस्थित महिलांनी फुलांची उधळण करत अजितदादांचे आभार मानले. यावेळी उपस्थित महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली.

याप्रसंगी अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव, प्रांताधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, कार्यकारी अभियंता अमोल पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, बारामती बँकचे अध्यक्ष सचिन सातव, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा मोनिका हरगुडे यांच्यासह जिल्ह्यातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित महिलांनी शासन महिलांसाठी राबवित असलेल्या विविध योजनांबाबत समाधानही व्यक्त केले.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!