ASSEMBLY ELECTION : राष्ट्रवादीकडून पुणे जिल्ह्यात विधानसभानिहाय निरीक्षकांच्या नियुक्त्या; योगेश जगताप यांच्यावर दिली इंदापूरची जबाबदारी

बारामती : न्यूज कट्टा  

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात पक्ष निरीक्षक तथा समन्वयकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या इंदापूर मतदारसंघाच्या निरीक्षकपदाची जबाबदारी बारामतीचे माजी नगराध्यक्ष आणि माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप यांच्यावर देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यभरात जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून पक्षाची भूमिका आणि आजवर केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवण्याबरोबरच विविध घटकांशी संवाद साधत निवडणुक रणनीतीत आघाडी घेतली आहे. पुणे जिल्ह्यातही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या आमदारांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ११ मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीकडून पक्ष निरीक्षक तथा समन्वयकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

सध्या पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या इंदापूर मतदारसंघाच्या बारामतीचे माजी नगराध्यक्ष आणि माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. आजवर मी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदापासून विविध पदांवर काम करत आपला संपर्क ठेवला आहे. त्यामुळे इंदापूरमध्ये या विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या विचारांचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं योगेश जगताप यांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून मतदारसंघनिहाय नियुक्त केलेले निरीक्षक : इंदापूर विधानसभा मतदारसंघ : योगेश जगताप, बारामती, बारामती  विधानसभा मतदारसंघ : बाळासाहेब पाटील, (बोरी, इंदापूर), दौंड विधानसभा मतदारसंघ : भरत खैरे (बारामती), पुरंदर विधानसभा मतदारसंघ : नंदूशेठ काळभोर (फुरसुंगी), भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघ : प्रविण शिंदे, मावळ विधानसभा मतदारसंघ, सुनिल चांदेरे (मुळशी), जुन्नर विधानसभा मतदारसंघ : डॉ. दिगंबर दुर्गाडे सर (वाल्हे, पुरंदर), आंबेगाव विधानसभा मतदारसंघ : संजय काळे (जुन्नर), शिरूर –हवेली विधानसभा मतदारसंघ : सचिन घोटकुले, पूजा बुट्टे-पाटील, खेड विधानसभा मतदारसंघ : सुभाष जाधव (वडगाव मावळ), खडकवासला विधानसभा मतदारसंघ : भगवान पासलकर (राजगड वेल्हे)

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!