Rajyasabha : त्यांच्या अनुभवाचा उपयोग जनतेच्या हितासाठी; प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्या भेटीनंतर सुनेत्रा पवार यांनी दिली ग्वाही..!

नवी दिल्ली : न्यूज कट्टा

सध्या दिल्लीत राज्यसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. खासदार सुनेत्रा पवार याही या अधिवेशनात सहभागी झाल्या आहेत. आज त्यांची राज्यसभेत प्रसिद्ध लेखिका आणि खासदार सुधा मूर्ती यांच्याशी भेट झाली. या भेटीनंतर सुनेत्रा पवार यांनी आपला अनुभव कथन करत सुधा मूर्ती यांच्या सामाजिक क्षेत्रातील अनुभवांचा तमाम जनतेच्या व्यापक हितासाठी करून घेण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याचे म्हटले आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या निमित्तानं खासदार सुनेत्रा पवार या सध्या दिल्लीत आहेत. आज त्यांनी राज्यसभेच्या कामकाजात सहभाग घेतला. या दरम्यान, त्यांची प्रसिद्ध लेखिका, समाजसेविका खासदार सुधा मूर्ती यांच्याशी भेट झाली. या भेटीत त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. या भेटीच्या निमित्तानं सुधा मूर्ती यांच्याबद्दल आलेला अनुभव सुनेत्रा पवार यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे.

सुनेत्रा पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, एक अत्यंत लोकप्रिय आणि उत्तम लेखिका, संवेदनशील समाजसेविका, टाटा उद्योग समूहातील पहिली महिला अधिकारी, इन्फोसिसच्या उभारणीत योगदान देणारी कर्तबगार उद्योगिनी, इंग्लंडच्या पंतप्रधानाच्या सासूबाई आणि अत्यंत साधेपणामुळे सर्वांच्या आदरस्थानी असणाऱ्या सुधा मूर्ती यांची आज झालेली भेट खूपच आनंददायी.

संसदेत आता माझ्या सहकारी असणाऱ्या खासदार सुधाताई यांचे कानडी हेलाचे मराठी खूपच गोड. इंग्रजी, हिंदीसह त्यांचे मराठी ऐकणे हा आनंदाचा ठेवा आहे.  तो ठेवा आता वारंवार गाठीशी बांधला जाणार आहे. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील अनुभवांचा जास्तीत जास्त उपयोग तमाम जनतेच्या व्यापक हितासाठी करून घेण्याचा माझा प्रयत्न राहील. माझ्या या प्रयत्नांना त्यांचे सहकार्य मिळेल, ही खात्री त्यांच्या आपुलकीने मिळाली. त्यामुळे यापुढेही त्यांच्याशी होत राहणाऱ्या भेटीची आज झालेली ही सुरवात विशेष लुभावणारी आहे, असे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!