DAUND BREAKING : कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले चिमुकल्या अर्भकांचे अवयव; सात अर्भकं फेकून दिल्याच्या घटनेनं दौंडमध्ये उडाली खळबळ

दौंड : न्यूज कट्टा

दौंड शहरानजीक असलेल्या बोरावकेनगर परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सहा ते सात अर्भकं आढळून आली आहेत. या अर्भकांचे अवयव प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये भरून कचऱ्यात फेकून दिल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर दौंड शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून ही अर्भकं कोणत्या रुग्णालयातून फेकली गेली याचा शोध पोलिस घेत आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी दौंड शहरानजीक असलेल्या बोरावकेनगर येथील प्राईम टाऊनच्या पाठीमागे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्भक आणि मानवी शरीराचे काही अवशेष आढळून आले. स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली असता सहा ते सात अर्भकं आढळून आल्याची माहिती मिळत आहे.

या ठिकाणी वैद्यकीय पथकही दाखल झाले असून त्यांच्याकडून या संपूर्ण अर्भकांची तपासणी केली जात आहे. या ठिकाणी आढळलेली अर्भकं आणि अवशेष ताब्यात घेण्यात आले आहेत. ही अर्भकं आणि काही मानवी शरीराचे अवशेष सीलबंद बरणीत भरलेले आहेत. त्यावर काही माहितीही नमूद करण्यात आलेली आहे. मात्र हे अवशेष कचऱ्याच्या ढिगाऱ्यात कसे आले, गर्भपाताचा काही प्रकार आहे का याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!