घरात कुणीही नसल्याचा गैरफायदा घेत ११ वर्षांच्या चिमूरडीवर अत्याचार; बारामती तालुक्यातील घटना

बारामती : न्यूज कट्टा  

घरात कुणीही नसल्याचं पाहून एका ११ वर्षांच्या चिमूरडीवर अत्याचार केल्याची घटना बारामती तालुक्यातील मूर्टी येथे घडली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

अण्णा किसन गोफणे (रा. मोराळवाडी, ता. बारामती) असं या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आज दुपारी १ वाजण्याच्या पिडीत मुलगी ही घरात एकटी होती. त्यावेळी आरोपी अण्णा गोफणे याने जबरदस्तीने घरात प्रवेश करत या चिमूरडीवर अत्याचार केला. ही घटना समजल्यानंतर संबंधित पीडितेच्या कुटुंबीयांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी अण्णा गोफणे याच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम ६५ (२), ३३२ (अ), बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा  कलम ४ (२), ६, अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ३(१) नुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. उद्या या आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड हे करीत आहेत.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!