धक्कादायक : विवाहितेनं आधी १४ महिन्यांच्या बाळाला विष पाजलं, नंतर स्वत: गळफास घेत केली आत्महत्या..!

बार्शी : न्यूज कट्टा  

एका २५ वर्षीय विवाहितेने आपल्या केवळ १४ महिन्यांच्या चिमुकल्याला विषारी द्रव्य पाजून स्वत: साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात वाणी प्लॉट परिसरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अंकिता वैभव उकिरडे (वय २५) असं या घटनेत मृत पावलेल्या विवाहितेचं आहे. तिचा मुलगा अन्वीक वैभव उकिरडे (वय १४ महिने) हा विषारी द्रव्य पाजल्यामुळे गंभीर असून त्याच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंकिता हिचं चार वर्षांपूर्वी वैभव विकास उकिरडे याच्याशी लग्न झालं होतं. वर्षभरापूर्वी या दांपत्याला पुत्रप्राप्ती झाली. शुक्रवारी घरातील लोक कामानिमित्त बाहेर गेलेले होते. त्यामुळं अंकिता घरी मुलासोबत एकटीच होती. त्यावेळी तिनं मुलाला विष पाजलं आणि त्यानंतर पंख्याला साडी बांधत गळफास घेऊन आत्महत्या केली.

घरकामासाठी येणाऱ्या मोलकरणीने घराचा दरवाजा कुणी उघडत नसल्यानं खिडकीतून डोकावल्यानंतर तिला अंकिताचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तर चिमुकला अन्विक हा अत्यवस्थ असल्याचं दिसून आलं. तिनं तात्काळ शेजारी आणि संबंधित कुटुंबीयांना या प्रकाराची माहिती दिली. गळफास घेतल्यामुळे अंकिताचा मृत्यू झाला आहे. या घटनेत १४ महिन्यांचा अन्विक वाचला असला तरी त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे. त्याच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अंकिता आणि तिच्या पतीत काही कौटुंबिक वाद होते का, याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!