BARAMATI BREAKING : आधी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव; आता ‘त्या’ नगरसेवकानं घेतली शरद पवार यांची भेट

बारामती : न्यूज कट्टा

बारामतीच्या राजकारणाची बहुतांश सुत्रे हाती असलेल्या माजी नगरसेवक किरण गुजर यांच्या बंधूंचा पराभव करणाऱ्या यशपाल पोटे यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनिल पोटे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारीही उपस्थित होते. या भेटीत शरद पवार यांनी निवडणुकीसह अन्य विषयांवर पोटे यांच्याशी संवाद साधल्याची माहिती मिळत आहे.

बारामती नगरपरिषद निवडणुकीत यशपाल पोटे यांनी ऐनवेळी अपक्ष उमेदवारी जाहिर केली. बारामतीचे माजी नगरसेवक किरण गुजर यांचे बंधू जितेंद्र गुजर यांच्याविरोधात त्यांनी निवडणुक लढवली. निवडणुक काळात मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले. त्यातच नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीतील अंतर्गत स्पर्धेतून झालेल्या राजकारणाचे पडसादही उमटले.

गुजर कुटुंबीयांनी प्रचंड ताकद लावूनही यशपाल पोटे यांनी मोठ्या फरकानं या निवडणुकीत विजय मिळवला. यशपाल पोटे यांच्या विजयाची सर्वत्र चर्चा झाली. त्याचवेळी किरण गुजर यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळं या प्रभागातील निकालाची आजही चर्चा होत आहे.

अशातच आज यशपाल पोटे यांनी आपले वडिल सुनिल पोटे आणि शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांसह ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत निवडणुकीबद्दल चर्चा झाली. तसेच अन्य विषयांवरही शरद पवार यांनी माहिती घेतली. एकूणच आधी राष्ट्रवादीच्या दिग्गज कुटुंबातील उमेदवाराचा पराभव आणि आता शरद पवार यांची भेट यामुळं यशपाल पोटे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!