BIG BREAKING : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची सभेला दांडी; संतापलेल्या अजितदादांनी दिला इशारा, म्हणाले, मला असं चालणार नाही..!

बारामती : न्यूज कट्टा    

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा आज शुभारंभ करण्यात आला. या सभेला माळेगावच्या दोन संचालकांनी दांडी मारल्याचं लक्षात येताच उपमुख्यमंत्री अजित पवार हे संतापल्याचं पाहायला मिळालं. तुम्हाला पदं हवी असतात तेव्हा तुम्ही सारखं येणार आणि आता असं वागणार. मला हे अजिबात चालणार नाही असा इशारा देत त्यांनी या दोघाही संचालकांना भेटीसाठी निरोप धाडला. अजितदादांच्या या पवित्र्यानंतर चर्चेला उधाण आलं असून काहींनी आपसूकच तलवार म्यान केली आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र कन्हेरी येथे करण्यात आला. सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे. त्यामुळं मला कुणी पदाधिकारी काही करत असतील तर फरक पडणार नाही. तुम्ही विनाकारण उघडं पडू नका असा गर्भित इशारा त्यांनी दिला. त्याचवेळी त्यांनी माळेगाव कारखान्याच्या दोन संचालकांचा उल्लेख करत ते कुठे आहेत अशी विचारणा केली.

ते उपस्थित नसल्याचं लक्षात येताच त्यांनी संताप व्यक्त करत तुम्हाला पदं हवी असतात तेव्हा तुम्ही माझ्या मागे लागता आणि आता असं वागता. हे मला अजिबात चालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं. उद्या दोघांनाही मला भेटायला सांगा असा निरोपही त्यांनी धाडला. त्यामुळे पक्षांतर्गत विरोधाचा फटका बसू नये यासाठी अजितदादांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं या निमित्तानं पाहायला मिळालं.

https://www.facebook.com/share/r/1CD4AqY2z9/

दरम्यान, तब्बल नऊ वर्षांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यात अनेकांनी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीत राष्ट्रवादीकडून संधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपवाद वगळता नव्या चेहऱ्यांना संधी दिली. त्यामुळं इच्छुकांच्या पदरी निराशाच आली. त्यातूनच अनेकांनी पक्षाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. हीच बाब लक्षात घेऊन अजितदादांनी जाहीर सभेत पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली. त्यामुळं पक्षाच्या निर्णयाबद्दल नाराज असलेल्या इच्छुकांनी आपसूकच आपली नाराजी दूर केल्याचं बोललं जात आहे.

 

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!