बारामती | न्यूज कट्टा
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम येत्या काही दिवसांत जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्या शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीबाबत सुनेत्रा पवार या आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे उद्याच्या या मेळाव्याकडे कार्यक्षेत्राचे लक्ष लागले आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणुक येत्या काही काळात होणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच आता सत्ताधारी राष्ट्रवादीने शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. शनिवारी सायंकाळी ४ वाजता होळ येथील सोमनाथ पॅलेस मंगल कार्यालयात हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात निवडणुकीबाबत सुनेत्रा पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर सोमेश्वर कारखान्याची निवडणूक पार पडत आहे. सोमेश्वर कारखान्यावर गेली अनेक वर्षे अजितदादांची एकहाती सत्ता राहिली असून त्यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर सोमेश्वर कारखान्याची भरभराट झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत अजितदादांच्या पश्चात अन्य पक्ष काय भूमिका घेतात याकडेही सभासदांचे लक्ष लागले आहे.

Post Views: 15