BARAMATI CRIME : सावत्र बहिणीचं घर जाळून फरार झाला; बारामती शहर पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकला..!

बारामती | न्यूज कट्टा

सावत्र बहिणीच्या घराला आग लावून जाळपोळ केल्याच्या आरोपातील पाहिजे आरोपी राकेश उर्फ बिट्या गणेश गायकवाड याला बारामती शहर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास नियोजनबद्ध सापळा रचून त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध न्यायालयीन वॉरंटही प्रलंबित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, बारामती शहर पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी राकेश उर्फ बिट्या गायकवाड याच्यावर घराची जाळपोळ करत धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता.  या घटनेनंतर तो फरार झाला होता. न्यायालयाने त्याच्याविरोधात वॉरंटही जारी केले होते. संबंधित प्रकरणाच्या साक्षीसाठी तो गैरहजर राहत असल्याने त्याला पकडून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या शोधासाठी यंत्रणा कार्यान्वित केली होती.

या दरम्यान, आरोपी पहाटेच्या वेळी आपल्या राहत्या घरी आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, पोलीस हवालदार उदय टापरे, पोलीस शिपाई अक्षय सिताफ, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे आणि महिला पोलीस शिपाई भाग्यश्री देवकाते यांच्या पथकाने पहाटे आरोपीच्या घराजवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.  न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावत कारागृहात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार राकेश उर्फ बिट्या गणेश गायकवाड याच्याविरुद्ध यापूर्वीही विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये बारामती शहर आणि तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे या आरोपीवर पुढील प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पावले उचलली जाणार आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!