SHOCKING : चॉकलेट मागितलं म्हणून नराधम बाप चिडला; चार वर्षांच्या निरागस चिमूरडीचा गळाच घोटला..!

लातूर : न्यूज कट्टा

चॉकलेटसाठी आग्रह धरल्यामुळे चिडलेल्या नराधम बापाने चार वर्षाच्या चिमूरडीचा साडीने गळा आवळत खून केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. लातूर जिल्ह्यातील भीमा तांडा येथे ही घटना घडली असून घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण लातूर जिल्हा हादरला असून क्षुल्लक कारणातून पोटच्या मुलीचा जीव घेणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होऊ लागली आहे.

आरुषी बालाजी राठोड असं या दुर्दैवी मुलीचं नाव आहे. तिच्या खूनप्रकरणी बालाजी बाबू राठोड (वय ३६) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथील बालाजी बाबु राठोड हा आपली पत्नी आणि चार वर्षांच्या मुलीसह वास्तव्य करतो. बालाजी हा मागील काही दिवसांपासून दारूच्या आहारी गेला असून तो घरात सातत्याने वाद घालत असतो.

त्याची मुलगी आरुषी हिने चॉकलेटसाठी आग्रह धरला. त्यावेळी चिडलेल्या बालाजीने साडीने स्वत:च्या लेकीचा गळा आवळून खून केला. मुलीचा जीव जाईपर्यंत त्याने साडीचा फास सैल केला नाही. या घटनेनंतर तो घरातून निघून गेला. या दरम्यान, त्याची पत्नी वर्षा ही घरी आल्यानंतर मुलीची अवस्था पाहून तिला धक्काच बसला. तिने तात्काळ उदगीर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.

याबाबत पोलिसांनी तपास केला असता बालाजीनेच हे कृत्य केल्याचं समोर आलं. पोलिसांना याबाबत सुगावा लागल्याचं समजल्यानंतर बालाजी हा पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. या प्रकरणी त्याची पत्नी वर्षा हिने फिर्याद दिली असून बालाजी सातत्याने घरात त्रास देत असल्याचे नमूद केले आहे. तो सतत दारू पिऊन सगळ्यांना जीवे मारण्याची धमकी देत होता, असेही फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या घटनेनंतर लातूर जिल्हा हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होऊ लागली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!