बारामती : न्यूज कट्टा
सत्ता असो की नसो अजितदादा बारामतीत असले की सर्वसामान्य नागरीकांना भेटून त्यांच्या समस्या सोडवायचे. अजितदादांनी सुरु केलेली हीच परंपरा कायम राहणार आहे. उद्या शुक्रवार दि. १३ मार्च रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सकाळी ८ ते ९.३० या वेळेत सहयोग निवासस्थानी जनता दरबार होणार आहे.
अजितदादा बारामतीत आल्यानंतर जनता दरबार घेवून नागरीकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढायचे. अजितदादांच्या अकाली निधनानंतर ही परंपरा पुढेही कायम राहणार आहे. उद्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सकाळी ८ ते ९.३० या वेळेत सहयोग निवासस्थानी जनता दरबार होणार आहे.
जनता दरबाराच्या निमित्तानं आलेल्या नागरीकांच्या समस्यांची सुनेत्रा पवार यांच्याकडून सोडवणुक केली जाणार आहे. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी धिरोदात्तपणे आपल्या कामाला सुरुवात केली आहे. पक्षासह उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी आपल्या कामाची चुणुक दाखवायला सुरुवात केली आहे.
अजितदादांच्या स्वप्नांची पूर्तता करतानाच त्यांचं कार्य अखंडपणे सुरु ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जनता दरबार होत असून अजितदादांप्रमाणेच सुनेत्रा पवार याही नागरीकांच्या अडीअडचणींचा निपटारा करताना दिसणार आहेत.




