बारामती : न्यूज कट्टा
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी बारामतीत पोटनिवडणूक होत आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ३० जणांनी आपले अर्ज माघारी घेतले. यामध्ये प्रामुख्याने कॉँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनीही आपला अर्ज मागे घेतला आहे. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
बारामतीची पोटनिवडणूक २३ एप्रिल रोजी होत आहे. अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३० जणांनी आपली उमेदवारी माघारी घेतली. तर २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज दिवसभरातील घडामोडीनंतर कॉँग्रेसनही या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळं कॉँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांनी पक्षाचा आदेश येताच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. दरम्यान, युवा नेते जय पवार यांनी आकाश मोरे यांची भेट घेत कॉँग्रेस पक्षाचे आभार मानले.
दुसरीकडे बारामतीची निवडणूक होणार यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्यासह २३ उमेदवार नशीब आजमावत आहेत. यामध्ये करुणा मुंडे, अभिजीत बिचुकले यांचा समावेश आहे. बारामतीची निवडणूक एकतर्फी होईल असा अंदाज असला तरी करुणा मुंडे आणि अभिजीत बिचुकले यांना या निवडणुकीत किती मते पडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे उमेदवार असतील निवडणूक रिंगणात : १) सुनेत्रा अजित पवार (राष्ट्रवादी कॉँग्रेस), २) राघू येताळा घुटुकडे (न्यू राष्ट्रीय समाज पक्ष), ३) सतीश कृष्णा कदम (हिंदुस्तान जनता पार्टी), ४) अभिजीत वामनराव बिचुकले (अपक्ष), ५) अविनाश वामनराव गायकवाड (अपक्ष), ६) करुणा धनंजय मुंडे (अपक्ष), ७) गजानन उत्तम गवळी (अपक्ष), ८) चंद्रकांत रंभाजी मोटे (अपक्ष), ९) चंद्रकांत सूर्यकांत वाघमोडे (अपक्ष), १०) दत्तात्रय रावसाहेब बेदरे (अपक्ष), ११) बाळासो मारुती धापटे (अपक्ष), १२) मिथुन सोपानराव आटोळे (अपक्ष), १३) मंगलदास निकाळजे (अपक्ष), १४) योगेश मोहनदास रतेश्वर (अपक्ष), १५) सोनाली सूर्यकांत राणे (अपक्ष), १६) रोहित राजू भोसले (अपक्ष), १७) विजयकुमार रामचंद्र भिसे (अपक्ष), १८) विराज महादेव शिंदे (अपक्ष), १९) शिवाजी जयसिंग कोकरे (अपक्ष), २०) सतीश नाना सोनवणे (अपक्ष), २१) सागर शरद भिसे (अपक्ष), २२) साजन भगवान अडसूळ (अपक्ष), २३) सीताराम विठ्ठल रणदिवे (अपक्ष)
या उमेदवारांनी घेतली माघार : १) संकेत गावडे, २) गोपाल तंतरपाळे, ३) दिनकर गायकवाड, ४) दादा थोरात, ५) सुवर्णा गायकवाड, ६) अरुण निटुरे (राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी), ७) खिजर पिरजादे, ८) विशाल घोरपडे, ९) उमेश म्हेत्रे, १०) दिलीप अळोणी, ११) संतोष कांबळे, १२) सिद्धाराम काकणकी, १३) अनिल तुपे, १४) त्रिशला कांबळे, १५) महेंद्र ताटे, १६)
उन्मेश देशमुख, १७) आकाश मोरे (कॉँग्रेस), १८) मोहन राऊत, १९) संदीप खरात, २०) दशरथ राऊत (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष), २१) त्रिभुवन पद्माकर, २२) प्रतीक्षा चव्हाण, २३) विक्रम कोकरे, २४) अभिजीत कांबळे, २५) विलास होळकर, २६) माऊली कांबळे, २७) रज्जाक जाफर मुलाणी, २८) राहुल थोरात, २९) अमोल कोकरे, ३०) अशोक खामगळ




