BIG NEWS : बारामती वकील संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन वाघ यांची बिनविरोध निवड; अन्य जागांसाठी होणार निवडणूक..!

बारामती । न्यूज कट्टा
बारामती वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड. सचिन सुधाकर वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उर्वरीत जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून त्यासाठी मंगळवार दि. १४ जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, ॲड. सचिन वाघ यांच्या बिनविरोध निवडीनंतर त्यांच्या समर्थक वकिलांनी एकच जल्लोष केला.
बारामती वकील संघटनेची निवडणूक जाहीर झाली आहे. अध्यक्षपदासाठी ॲड. सचिन वाघ यांच्यासह ॲड.सुप्रिया काकडे, ॲड.अविनाश गायकवाड, ॲड.अभिजीत जगताप यांनी अर्ज दाखल केला होता. यामध्ये चर्चेअंती ॲड. सचिन वाघ यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार उर्वरीत तीनही उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. त्यामुळे ॲड. सचिन वाघ यांची बिनविरोध निवड झाली.
दुसरीकडे अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झालेली असली तरी कार्यकारिणीच्या अन्य जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी मंगळवार दि. १४ जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी ॲड.माधुरी नेवसे, ॲड. चित्रा वाघमोडे, ॲड. अक्षय गायकवाड, ॲड. राजेंद्र मासाळ, ॲड. महेश आटोळे, ॲड. शकीला आत्तार हे उमेदवार आहेत. तर ॲड. सचिन दळवी यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.
सचिवपदासाठी ॲड. विक्रांत कोकरे, ॲड. स्नेहा मखरे हे उमेदवार असून ॲड. हर्षद जगदाळे यांनी अर्ज मागे घेतला आहे. तसेच सहसचिव पदासाठी ॲड. आकाश घारे, ॲड. विशाल होळकर हे उमेदवार आहेत. तर ॲड. भूषण जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. ग्रंथपाल पदाकरिता ॲड. अक्षय गायकवाड, ॲड.कल्याण राजगुरू हे उमेदवार, तर ॲड. राहुल बंडगर यांनी माघार घेतली आहे. खजिनदार पदाकरिता ॲड. हर्षद तिकोटे, ॲड. भूषण जगताप हे उमेदवार आहेत. महिला प्रतिनिधी पदाकरिता ॲड. नुजहत शिकीलकर आणि ॲड. भाग्यश्री जगधने या नशीब आजमावत आहेत.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!