BIG NEWS : काऱ्हाटीच्या कृषि उद्योग मूल शिक्षण संस्थेची इंडिया बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद; सलग तीस तासांच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी मिळालं नामांकन

बारामती : न्यूज कट्टा  

बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथील कृषि उद्योग मूल शिक्षण संस्थेने सलग ३० तासांचा बहू व्यवसाय कौशल्य प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवला होता. संस्थेचे अध्यक्ष दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कृतीतून आदरांजली वाहण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमाची इंडिया बूक ऑफ रेकॉर्डकडून नोंद घेण्यात आली असून संस्थेचा गौरव करत अधिकृत प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळं बारामतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री तथा कृषि उद्योग मूल संस्थेचे अध्यक्ष अजित पवार यांना कृतीशील आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने संस्थेकडून हा उपक्रम राबवण्यात आला होता. दि. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता सुरू करण्यात येवून दि. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अखंडितपणे सुरू ठेवण्यात आला. सलग ३० तास चाललेल्या या उपक्रमात संस्थेच्या विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

संस्थेचे अध्यक्ष दिवंगत अजितदादा नेहमीच विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांचं ज्ञान मिळावं यासाठी आग्रही होते. त्या अनुषंगाने त्यांनी संस्थेत विविध कौशल्याधारीत अभ्यासक्रम सुरू केले होते. याच पार्श्वभूमीवर दादांच्या स्वप्नातील समाज घडावा, विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याधारित शिक्षणाची जाणीव निर्माण व्हावी, विविध ट्रेडमधील प्रत्यक्ष अनुभव देणे तसेच त्यांचा आत्मविश्वास व कार्यक्षमता वाढावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्षा, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!