BIG BREAKING : धनगर आरक्षण लढ्यातील महत्वाच्या संघटनेचा सुनेत्रा पवार यांना बिनशर्त पाठिंबा; पदाधिकाऱ्यांनी मुंबईत भेट घेऊन जाहीर केला पाठिंबा

बारामती : न्यूज कट्टा   

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात बारामतीच्या विकासाची गती आणि सामाजिक घडी अबाधित राहावी,यासाठी धनगर आरक्षणाच्या लढ्यात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या यशवंत सेनेने बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला बिनशर्त पाठींबा जाहीर केला आहे. यासंदर्भात यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील यांनी सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांची भेट घेत पाठिंब्याचे पत्रही दिले आहे.

यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.माणिकराव दांगडे पाटील, उद्योजक संग्राम सोरटे,दत्ता माळशिकारे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,खासदार पार्थ पवार यांची मुंबईत देवगिरी निवासस्थानी भेट घेतली व पोटनिवडणुकीसाठी बिनशर्त पाठींबा जाहीर केला. स्व. बी.के.कोकरे प्रणित यशवंत सेना ही राज्यातील धनगर समाजाला एन.टी.चे आरक्षण मिळवून दिलेली एकमेव नोंदणीकृत संघटना आहे. समाजाच्या एस.टी. प्रवर्ग आरक्षण अमलबजावणीसह इतर मागण्यांसाठी यशवंत सेनेने तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता अशी माहिती दांगडे पाटील यांनी दिली.

अजितदादांनी बारामतीचा चौफेर विकास करताना आणि सहकारी,पणन,स्थानिक स्वराज्य संस्थांवर पदाधिकार्‍यांच्या नियुक्ती करताना येथील धनगर समाजाला वेळोवेळी संधी दिलेली आहे. सध्या बारामती तालुक्यात सुरु असलेल्या विकासाची गती, सामाजिक एकोपा अबाधित राहाण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यशवंत सेना बिनशर्त सक्रीय पाठींबा देत असल्याचे दांगडे पाटील यांनी स्पष्ट केले.

याआधी यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले, उपाध्यक्ष आण्णासाहेब रुपनवर, सचिव नितीन धायगुडे, समाधान पाटील, बाबा भोजने, दिलीप गडदे, गोविंद नरुटे आदींच्या राज्य कार्यकारीणीच्या ठरावान्वये उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या प्रचारार्थ बारामती मतदार संघात बैठका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!