BARAMATI : बारामती तालुक्यातील सहा गावांसाठी टँकर मंजूर; उर्वरीत गावांमध्ये पाहणी करून टँकर सुरू करणार : किरण तावरे यांची माहिती

बारामती : न्यूज कट्टा

बारामती तालुक्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. तालुक्यातील एकूण २१ गावांना टंचाईग्रस्त घोषित करण्याचा प्रस्ताव प्रांत अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला होता. त्यापैकी सहा गावांच्या टँकर प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून संबंधित गावांपैकी पांच गावांमध्ये सोमवारपासून  पाण्याचे टँकर सुरू होणार असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी दिली.

बारामती पंचायत समितीच्या माध्यमातून प्रांत कार्यालयाकडे पाठवलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा केल्यानंतर गाडीखेल, सोनवडी सुपे, देऊळगाव रसाळ, थोपटेवाडी आणि अंजनगाव या गावांसाठी टँकर मंजूर करण्यात आले आहेत. तर कारखेल गावाचा प्रस्ताव सोमवारी मंजूर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पाच गावांमध्ये उद्यापासून टँकर सुरू होणार आहे. तर कारखेल गावातही तात्काळ टँकर सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती किरण तावरे यांनी दिली.

दरम्यान, उर्वरित टंचाईग्रस्त गावांची पाहणी प्रक्रिया सुरू असून लवकरच त्या गावांमध्येही टँकर सुरू करण्यात येणार असल्याचे तावरे यांनी सांगितले. प्रांत कार्यालयाकडे आणखी काही गावांचे प्रस्ताव सध्या प्रलंबित आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या माध्यमातून जिरायत भागातील गावांमध्ये पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत विशेष लक्ष देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

तालुक्यातील टंचाई ग्रस्त गावांचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे आदेश ग्रामसेवकांना देण्यात आले आहेत. याशिवाय, येत्या दोन दिवसांत जिरायती भागाचा दौरा करून पिण्याच्या पाण्याची स्थिती आणि जनावरांच्या चाऱ्याची पाहणी करण्यात येणार असल्याचेही सभापती किरण तावरे यांनी स्पष्ट केले.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!