SHOCKING : मुलं शिक्षणासाठी बाहेरगावी असताना आई-वडिलांनी मृत्यूला कवटाळलं; दांपत्याची एकाच दोरीनं गळफास घेत आत्महत्या

चाळीसगाव : न्यूज कट्टा   

लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर पती-पत्नी संपूर्ण जीवन एकत्र जगण्याचं वचन घेत असतात. मात्र जळगाव जिल्ह्यात हृदय हेलावून टाकणारी घटना घडली असून पती-पत्नीने एकाच दोरीनं आपली जीवनयात्रा संपवलं आहे. मुलं शिक्षणासाठी बाहेरगावी असताना आई-वडिलांनी टोकाचं पाऊल उचलल्यामुळं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील शिवापुर येथे ही घटना घडली आहे.

भगवान पोपट जाधव (वय ३८) आणि आशाबाई भगवान जाधव (वय २७, रा. शिवापुर, ता. चाळीसगाव) असं आत्महत्या केलेल्या दांपत्याचं नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, जाधव पती-पत्नी हे शिवापूर हद्दीतील शेतात वास्तव्यास होते. भगवान जाधव हे स्वत:च्या शेतीसह मजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भगवान जाधव आणि आशाबाई जाधव यांनी घरापासून काही अंतरावर असलेल्या उंबराच्या झाडाला एकाच दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

विशेष म्हणजे, त्यांची दुचाकी झाडाच्या खाली लावलेली होती आणि दुचाकीवर चढून दोघांनी झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत जीवनयात्रा संपवली. सकाळी शेजारील शेतकरी शेतात गेल्यानंतर जाधव दांपत्य झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. स्थानिक ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी या दोघांना झाडावरून खाली उतरवून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.

जाधव दांपत्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन लहान मुलं आहेत. हे दोघेही शिक्षणासाठी बाहेरगावी राहतात. जाधव दांपत्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र जाधव दांपत्यानं टोकाचं पाऊल उचलल्यामुळं त्यांची मुलं पोरकी झाली आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!